शेतकरी आंदोलनाचे नऊ महिने : भारतीय जनआंदोलनाच्या इतिहासातल्या एका असाधारण लढ्याची पाच महत्त्वाची वैशिष्ट्यं
पंजाबमधून सुरू झालेलं हे आंदोलन लवकरच हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात प्रभावी होणं, ही आता जुनी गोष्ट झाली. ते स्वाभाविकही होतं. हा तो परिसर आहे, जिथं शेती अपेक्षेनुसार विकसित आहे आणि तीन चतुर्यांश सरकारी खरेदी याच भागांतून होते. पण दरम्यानच्या काळात हे आंदोलन देशाच्या इतर भागांतही पोहचलं आहे. ज्या ठिकाणी हमीभावावर सरकारी खरेदी जवळपास अवलंबूनच नाही, तिथंही या आंदोलनाची गाज ऐकायला येते आहे.......